तुम्हाला माहिती आहे का?
बृहन्मुंबई महानगरपालिका ही दररोज ३९० कोटी लीटर अर्थात ३ हजार ९०० दशलक्ष लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना करते.
देशातील पहिली नळ पाणीपुरवठा योजना ही आपल्या मुंबईतच सन १८६० मध्ये सुरू झाली.
४ प्रमुख सर्वोपचार रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १६ सर्वोपचार रुग्णालये, ४ विशेष रुग्णालये, तब्बल २०० दवाखाने आणि १०७ हिंदुहृदय सम्राट आपले दवाखाने यांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना अविरतपणे वैद्यकीय सेवा सुविधा देत आहे.
५ वैद्यकीय महाविद्यालये असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये असणाऱ्या बेड्सची संख्या ही १२ हजार ४६२ इतकी आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे दररोज तब्बल ६५ लाख किलो अर्थात ६,५०० मेट्रिक टन एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणातील कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन करण्यात येते
स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून आणि वस्ती पातळीवरील ८३४ संस्थांच्या सहकार्याने दररोज २,५०० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन व वर्गीकरण करण्यात येते.
महानगरपालिका क्षेत्रातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तब्बल ३१ हजार ६७८ कर्मचारी नित्यनेमाने कार्यरत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला संयुक्त राष्ट्र संघाने गौरविले असून हा विभाग आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास अव्याहतपणे कार्यरत असतो
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १ हजार १४६ शाळा असून यामध्ये असणाऱ्या सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्यासाठी ९ हजारांपेक्षा अधिक शिक्षक समर्पित भावनेने कार्यरत आहेत
मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड, इंग्रजी यासारख्या विविध ८ भाषांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे.
आव्हानात्मक क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १८ शाळा असून त्यामध्ये ७६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये संगणकीय कौशल्य व अत्याधुनिक शिक्षणासह चित्रकला, मूर्तीकला, शिवणकाम, पाक कौशल्य, सुतार काम, बागकाम, ओरिगामी, गायन - वादन - नृत्य यासह विविध संगीत प्रकार आणि क्रीडा कौशल्ये याचेही प्रशिक्षण नियमितपणे देण्यात येते
बृहन्मुंबई महानगरपालिकेने विरंगुळ्याची ठिकाणे म्हणून तब्बल ७०० पेक्षा अधिक उद्याने आणि ३०० पेक्षा अधिक मैदाने नागरिकांच्या सेवेत रुजू केली आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची ६ नाट्यगृहे असून २ ठिकाणी क्रीडा संकुल आणि ५ ठिकाणी जलतरण तलाव देखील कार्यरत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची अंदाजीत लोकसंख्या ही १ कोटी २९ लाख २१ हजार ६०५ इतकी असून यांच्यासह मुंबईत दररोज कामानिमित्त येणाऱ्या लाखो नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्यातपणे पुरविण्याचे कार्य बृहन्मुंबई महानगरपालिका अखंडपणे व समर्थपणे करीत आहे.